
गाडी आली गाडी आली चला पळा रे
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे ।।धृ.।।
गाडी आली कोकणातून, आंबे आणले भरून भरून
आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे ।।१।।


गाडी आली वसईहून, केळी आणली भरून भरून
केळी उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे ।।२।।
गाडी आली नागपूरहून, संत्री आणली भरून भरून
संत्री उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे ।।३।।


गाडी आली काश्मी रहून, सफरचंदं आणली भरून भरून
सफरचंदं उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे ।।४।।