जंगलात ठरली मैफल

जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
अस्व ल म्हणालं, हि तर हत्तीची अक्कल.
तबल्यावर हो ती कोल्होबाची साथ
वाघोबा म्हणाले, नाही ना बात?
पेटी मी कि ती वाजवतो सुंदर
हसत ह सत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस
संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस!
मुंगीने लावला वरचा सां
आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर!

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.