झोपाळा गेला उडून

एका तळ्यात दोन बेडूक होते.
एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले.
त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली.

वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला !
दोघेही बेडूक त्या वर बसून झोके घेऊ
लागले.

तोच काय गंमत झाली, अचानक तो
झोपाळा उडू लागला.

ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय
आहेत, हे लक्षात आल्या वर बेडकांनी
पटापट पाण्या त उड्या घेतल्या .

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.