दिशा आणि नकाशा – इयत्ता तिसरी

वर्गात दोन रांगा करां. मग एकमेकांच्या समोर उभे राहा.

आता पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या समोर असलेल्या मुलीला/मुलाला सांगा. 
१. वर्गाचा फळा तुमच्या कोणत्या बाजूला अाहे? 
२. वर्गाचा मुख्य दरवाजा तुमच्या कोणत्या बाजूला आहे?
३.शिक्षकांचे टेबल तुमच्या कोणत्या बाजूला आहे ?

तुमची व समोरच्या मुलाची/मुलीची उत्तरे निराळी अाहेत ना ? असे का ? समजा, फळा तुमच्या उजव्या बाजूला असेल, तर तो समोरच्या मुलाच्या/मु्लीच्या डावीकडे असेल. समजा, फळा तुमच्या मागच्या बाजूला असेल, तर तो समोरच्या मुलाच्या/मुलीच्या पुढच्या बाजूला असेल.

अशाच प्रकारे वर्गाचा मुख्य दरवाजा, शिक्षकांचे टेबल याबाबतची तुमची व समोरच्या मुलाची/मुलीची उत्तरे वेगवेगळी येतील. उजवीकडे, डावीकडे, पुढे व मागे अशा उत्तरांवरून एखादी वस्तू नेमकी कोठे, कोणत्या बाजूला आहे ते सांगता येत नाही. म्हणून एखादी वस्तू कोठे अाहे किंवा कोणत्या बाजूला आहे हे सांगण्यासाठी दिशांचा वापर केला जातो.

आता आपण दिशाचा उपयोग करून आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा शोधणार आहोत. शिक्षकांची मदत घेवून वर्गाच्या भिंतीवर मुख्य दिशा लिहा. आता पुन्हा एकमेकांसमोर उभे राहा. वर्गाचा फळा, मुख्य दरवाजा व शिक्षकांचे टेबल कोणत्या दिशेला आहे ते एकमेकांना सांगा. आता तुमची व समोरच्या मुलाची/मुलीची उत्तरे एकसारखी येतील. एखादी वस्तूकोठे आहे किंवा कोणत्या बाजूस अाहे, हे दिशाचा उपयोग करून बरोबर सांगता येते.

। दिशा ओळखायला शिकूया

पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत. क्या कशा ओळखायच्या ? सूर्य ज्या बाजूने उगवतो, ती पूर्व दिशा.सूर्य ज्या बाजूला मावळतो, ती पश्चिम दिशा.

पूर्व व पश्चिम दिशा एकमेकींच्या समोरासमोर असतात.

पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिले, तर पश्चिम दिशा आपल्या मागे असते त्याच वेळेस आपल्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येते, तर उजव्या बाजूला दक्षिण दिशा येते.
तुमच्या परिसरात सूर्योदयाच्या  वेळी ही कृती करून पहा व दिशा समजून घ्या.

चौकटीची गंमत… 
खाली मोठी चौकट दिली अाहे त्या चौकटीत मधोमध तुमचे घर दाखवले आहे. या चौकटीच्या चार बाजूंवर पिवळे पट्टे दिले आहेत. या पट्ट्यांमध्ये दिशा लिहायच्या आहेत.

तुमच्या घराच्या कोणत्या बाजूला सूर्य उगवतो ? ती आहे पूर्व दिशा. 
घराच्या ज्या बाजूला सूर्य उगवतो, त्या बाजूच्या पिवळ्या पट्ट्यात ‘पूर्व’ दिशा लिहा.पूर्व दिशेच्या समोरच्या पट्ट्यात पश्चिम दिशा लिहा. उरलेल्या दोन मोकळ्या पट्ट्यामध्ये उत्तर व दक्षिण दिशा येतील. त्या विचार करून लिहा.

तूमच्या घराजवळ असलेली इतर ठीकाणे खाली दिली आहेत ती ठीकाणे चौकटीत लिहा.
(१) तुमच्या शेजारची घरे
(२) तुमच्या घराजवळचे दूकान
(३) झाड
(४) जवळचा रस्ता
(५) जवळचा बसथांबा
आता बघा बरं तुमच्या घराचा परिसर कसा दिसतो ते !

माहीत आहे का तुम्हाला

१.सूर्य रोज उगवतो व मावळतो. त्यामुळे माणसाने दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतला आहे.

२. होकायंत्रामधील चुंबकसूई नेहमी उत्तर-दक्षिण दिशा दाखवते. तुम्ही शिक्षकांच्या किंवा पालकांच्या मदतीने ती पाहू शकता.

काय करावे बरे

सई आणि अभय यांना शाळेत खालील समस्या सोडवण्यास सांगितली आहे. तुम्ही त्यांना मदत कराल का खाली दिलेले क्रोडे सोडवा.

अ. या चित्रात पूर्व दिशा दिली अाहे त्यावरून इतर तीन दिशा पिवळ्या चौकटींमध्ये लिहा. 
आ. आइस्कीमच्या दुकानापासून बसथांब्याकडे जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावे लागेल ?

इ. अमीरला आइस्कीमच्या दुकानात जायचे आहे त्यासाठी त्याला कोणत्या दिशेला जावे लागेल ? 
ई. साराला बसस्थानकाकड़े जायचे अहे तिला कोणत्या दिशेला जावे लागेल ?

चला खेळूया

गावाची पूर्व दिशा ओळखा. कोणत्या दिशेला काय-काय आहे ते समजून घ्या. त्यानंतर वर्तुळा्त गोल फिरत राहा. आता गटप्रमुखाने सांगितलेल्या दिशेला पटकन तोंड करून उभे रहा. चुकेल तो बाद.

० नकाशामधील दिशांचा वापर

नकाशामध्ये दिशा दिलेल्या असतात. त्यासाठी नकाशात दिशाचक्र दिलेले असते त्यावरून नकाशातील दिशा समजतात. नकाशा वाचण्यापूर्वी त्यातील दिशा तुमच्या परिसरातील दिशांशी जोडूनघ्यायच्या असतात. उदा. नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील पूर्व दिशेशी जोडून घ्यावी लागते. असे केल्यामुळे नकाशामधील ठीकाणे नेमकी काेणत्या दिशेला अहित हे तुम्हाला लगेच कळेल. पाठ्यपुस्तकातील नकाशे वाचतानासुद्धा हीच पद्धत वापरा.

जरा डोके चालवा

१ . उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे रहा. आता तुमचा उजवा कान कोणत्या दिशेकडे असेल? डावा कान कोणत्या दिशेला असेल ? 
२. सूर्य मावळताना तुमची सावली कोणत्या दिशेला पडेल?

० जिल्हा ,राज्य व देश

‘भारत माझा देश आहे’ हे प्रतिज्ञेतील वाक्य आपण पहिलीपासून वाचत आलो आहोत. इयत्ता दुसरीमध्ये राज्य, राष्ट्र व जग हे शब्द तुम्ही वाचले आहेत. या पाठ्यपुस्तकात देखील अनेक ठिकाणी पृथ्वी, जग, देश, राज्य, जिल्हा, तालुका व गाव हे शब्द आहेत चला तर मग, आपण जिल्हा, राज्य, देश, पृथ्वी व जग यांची तोंडओळख करून घेऊया.

आपण घरात राहतो. आपली घरे जमिनीवर बांधलेली असतात. ही जमीन खूप दूरपर्यंत पसरलेली असते अशा मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला खंड म्हणतात. पृथ्वीवर खंडाप्रमाणेच खारट पाणी देखील पसरलेले अाहे. या भागाला महासागर म्हणतात. पृथ्वीला ‘जग’ असेही म्हणतात. पृथ्वीवरील जमिनीवर अनेक देश आहेत. हे देश अनेक राज्यांचे मिळून तयार झाले आहेत. आपण महाराष्ट्र राज्यात राहतो. अशा अनेक राज्यांचा मिळून अापला भारत देश तयार झाला आहे. तुमचा जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत देश व जग हे नकाशे सोबत दिलेले अाहेत या नकाशाबद्दलच्या कृती पुर्ण करा.

माहीत आहे का तुम्हाला

नकाशातील सूची : नकाशात द्यायची माहिती ही चिंह, चित्रे, खुणा, रंगांच्या छटा यांच्या मदतीने दाखवतात. त्यांची यादी नकाशात दिलेली असते.  तिला सूची असे म्हणतात. सूची मुळे आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत होते.

हे नेहमी लक्षात ठेवा

दिशा ठरवण्यासाठी आपल्याला उगवत्या सूर्याचा उपयोग झाला निसर्गातील अनेक घटकांची आपल्याला अशीच मदत होत असते.

नकाशा मैत्री !

  • सोबत महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिला आहे.
  • त्यात वेगवेगळे जिल्हे दाखवले आहेत.
  • या नकाशात महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर दाखवळ्या आहेत.
  • नकाशात आपला जिल्हा शोधा व रंगवा.
  • सूचीत आपल्या जिल्ह्याची चौकट दिली आहे, तीही त्याच रंगाने रंगवा. तुमच्या जिल्ह्याचे नाव सूचीत माझा जिल्ह्याच्या पुढे लिहा
  • आपल्या जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांची नावे खालील चौकटीत लिहा.

नकाशाशी मैत्री

०खाली आपल्या देशाचा नकाशा दिला आहे. 
० त्यात आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली ही सुद्धा दाखवली आहे.

आपल्या देशाच्या नकाशा त आपले राज्य शोधा व ते रंगवा.

नकाशाशी मैत्री

  • खाली जगाचा नकाशा दिला आहे.
  • त्यात जमीन (खंड) पांढ-या रंगाने दाखवली आहे, पाणी (महासागर) निळ्या रंगाने दाखवले आहे.
  • जगातील, जमीन व पाण्याचा भाग एकाच वेळी दिसावा, यासाठी हा विशेष नकाशा तयार केला आह
  • जगाच्या नकाशातील भारत लिहिलेला भाग रंगवा.
  • नकाशाशेजारी दिलेल्या चौकटीत तसाच रंग देउन पुढे भारत असे लिहा. हा आपला देश आहे’

आपण काय शिकलो

मुख्य दिशांची ओळख. 
नकाशातील दिशाचक्राचा उपयोग. 
नकाशांच्या आधारे जिल्हा, राज्य, देश यांची ओळख

———————————————स्वयंअध्ययन——————————————

खाली दिलेल्या या घटकावर आधारीत प्रश्न व त्याचे चार पर्याय दिले आहेत. ज्यावेळी Next बटनावर क्लिक कराल त्याचवेळी पुढील प्रश्न दिसेल. प्रश्न व उत्तर त्याच त्या क्रमांकावर येणार नाहीत. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी प्रश्न व उत्तराचा क्रमांक बदललेला दिसेल.

1. छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असतांना त्यांनी नाशिक जिल्ह्यातील कोणत्या गावी आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता ?

 
 
 
 

2. राजगुरू हे वयाच्या १५ व्या वर्षी कोणत्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी बनारसला गेले ?

 
 
 
 

3.

 शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म कोठे झाला ?
 
 
 
 

4. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी गावातील लोक कशावर अवलंबून असतात ?

 
 
 
 

5. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव तीर्थक्षेत्री कशाचा बाजार भरतो ?

 
 
 
 

6.

  प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस कसे रहात असे?
 
 
 
 

7. रायगड किल्ल्यामुळे कोणता जिल्हा ओळखला जातो ?

 
 
 
 

8.

 अनेक वस्त्यांचे मिळून काय तयार होते ?
 
 
 
 

9. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव कोणते ?

 
 
 
 

10. अहमदनगर जिल्ह्यातील कोणते तीर्थक्षेत्र गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे .

 
 
 
 

Question 1 of 10

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.