पाऊस

गोष्ट ऐक. त्याप्रमाणे चित्र काढ.

दिन ू शाळेतून घरी निघाला होता.
आकाशात काळे ढग जमा झाले होते.
थोड्या वेळातच पावसाला सुरुवात
झाली. आकाशातून पाण्या चे थेंब
खाली येत होते. दिन ूला त्या ची गंमत
वाटली.
दिन ू थेंबाला म्हणाला, ‘‘ थेंबा
थेंबा, जरा माझ्या शी बोल.’’ थेंब
म्हणाला, ‘‘काय रे दिनू?’’ दिन ू
म्हणाला, ‘‘तू आकाशातून उंचावरून
येतोस हे दि सले मला; पण तू आकाशात

गेलास कसा ते काही कळले नाही
मला!’’
थेंब म्हणाला, ‘‘अरे खूप ऊन
पडले, की आम्ही खूप खूप तापतो,
आमची वाफ होते, वाफ हलकी
हलकी असते. ती वर वर आकाशात
जाते. मग वाफेचे ढग तयार होतात.
ढगाला गारगार वारा लागतो, मग
आम्ही खाली येतो, तुम्हां ला पाणी
द्यायला. नदी, नाले, तळी
भरायला.’’

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.