१०. चिंटू रुसला… चिंटू हसला.

चिंटू रोज सकाळी उशि रा उठायचा. आईबाबा त्या ला लवकर उठवायचे. पण छे! चिंटू काही उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली, की घाईघाईने अंघोळ उरकून, गणवेश घालून धावतपळत शाळेत जायचा. विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची, चिडवायची. त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत. त्याला आपलाच राग यायचा. तो नाराज राहायचा. तो स्वत:वरच रुसायचा. काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा.

एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून, त्याची ॠतुजाताई जवळ आली. चिंटूला म्हणाली, “चिंटू काय झाले रे?’’ चिंटू म्हणाला, “बघ ना, माझ्या शी कोणी बोलत नाही, खेळत नाही. मला खूप वाईट वाटते.” “अरे, एवढेच ना! हे बघ चिंटू, मी तुला काय करायचे ते सांगते, करशील ना तू? ऐकशील ना माझे?” ॠतुजा म्हणाली. चिंटू म्हणाला, ‘‘हो ऐकेन ना मी सगळे,
सांग ना.’’ ॠतुजा म्हणाली, “हे बघ, रोज
सकाळी लवकर उठायचे. शौचास जाऊन
यायचे. हात-पाय स्वच्छ धुवायचे. दात घासायचे. अंघोळ करायची. स्वच्छ कपडे घालायचे. केस विंचरायचे. दप्तर नीट भरायचे. दररोज अभ्या स करायचा. असे
दररोज केले, की सगळेच तुझे मि त्र होतील.” चिंटूला हे पटले.

दुसरा दिवस उजाडला. कोणीही न सागंताच चिंटू सकाळी लवकर उठला. ॠतुजाताईने सांगि तलेले सगळे केले. अभ्यासाला बसला. आईबाबांना आनंद झाला. शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले, चिंटू सुंदर दिसत होता. तो फारच खुशीत होता. चिंटू नाचतच शाळेत गेला. चिंटूभोवती मुले गोळा झाली. स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला. शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले. चिंटू आनंदाने हसू लागला.

———————————————स्वयंअध्ययन——————————————-

कशासाठी काय काय वापरतात ते उच्चार.
(अ) दात घासण्यासाठी …………………………
(आ) अंग पुसण्यासाठी …………………………
(इ) कपडे धुण्यासाठी …………………………..
(ई) अंगण झाडण्यासाठी ……………………….
(उ) केस धुण्यासाठी …………………………….

खाली दिलेल्या शब्दांचा push to speak बटण दाबून उच्चार कर..
(अ) ॠतू (आ) ॠण (इ) ॠषी (आ) ॠषभ
(आ) ॠतुजा

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.