“आई… आई , करना गं भेळ’’
“छे रे बाबा, मला नाही वेळ’’
एवढे कसले नाराज होता
भेळ करू बघता बघता!
चुरमुरे घ्या कुरकुरीत
शेव पापडी चुरचुरीत
टोमॅटो, कांदा, कोथींबीर
अगदी बारीक छान चीर!
पाणी… खजूर, थोडी चिंच
कालवून चटणी केली मस्त!
थोडं ति खट..थोडं मीठ
मिसळून टाका छान नीट!
गोल बसा.. गालात हसा
वाटून घ्या ..पसा..पसा!
बघता बघता चट्टामट्टा
कागद नक्की डब्या त टाका!
- मंदाकिनी गोडसे
1 thought on “११. भेळ”