पहाटे पहाटे कोंबडा आरवतो. झरीपाडा जागा होतो. हिरव्या गार डोंगराआडून सूर्य उगवतो. सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन नि घतो. सकाळ होताच लहानमोठी माणसे आपापल्या कामाला लागतात. लोक विहिरीवरून पाणी भरतात. शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात.बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो. मुले-मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात.
पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे. झरा डोंगरात उगम पावतो. तो मोठ्या ओढ्याला मि ळतो. मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो. डोंगर उतारावर खाचरात भातशेती होते. तसेच नाचणीचे पीक घेतले जाते.
पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत. घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यां नी किंवा झावळ्यांनी शाकारतात. घरातील जमीन, अंगण शेणाने सारवतात. भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात. ती वारली चित्रकलेतील असतात. घरे आतबाहेर स्वच्छ असतात. घरातील भांडीकुंडी स्वच्छ असतात. परिसरात कोठेही कचरा नसतो. घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो. कोंबड्यासाठी खुराडे असते. घरोघरी कुत्रा पाळला जातो.

घराच्या अवतीभोवती खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यांसारखी झाडे असतात. लोक आनंदाने फळे खातात. त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी, सुकी मासळी आणि पेज असते. अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवळी, ससेकान यांसारख्या रानभाज्या ते आवडीने खातात. कंद उकडून खातात.
घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते. रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला, की मुले-मुली नाच करतात. नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात.घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीण म्हणतात. पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात.

- खालील गाळलेल्या जागांची उत्तरे त्याखालील push to speak बटण दाबून उच्चारा.
- (अ) पाड्याचे नाव …………………….
- (आ) चित्रकलेचे नाव ………………….
- (इ) वाद्याचे नाव ……………………
- (उ) घरातील मोठी महिला ……………
- (ई) घरातील मोठा पुरुष ………………
1 thought on “झरीपाडा- इयत्ता दुसरी”