मंगळावरची मुले
पृथ्वी वर आली
शाळेतल्या गंमती
सांगू लागली
मंगळावरच्या शाळेत
पाटी-पेन्सिल नसते
पुस्तकाचेही ओझे
खांद्यावर नसते
संगणक पेटीच
वर्गात असते,
शिक्षकांच्या हातात
पुस्तक नसते
मुलांपाशी असते
संगणक डबी,
तिच्यात असते
सगळी खुबी
इतक्या त तबकडी
चमकू लागली
मुलांना घेऊन
भुर्रकन गेली!
फादर फिलीप कार्व्हालो
1 thought on “२३.मंगळावरची शाळा”