काय ते तोंडी सांग
(अ) दवबिंदूचे पडतात ……………………..
(आ) फुले आनंदाने उधळतात ……………………..
कसे ते सांग
१) फुलांकडे जावे ……………………..
2) फुलांचे हृदय ……………………..
हळूच या हो, हळूच या!
गोड सकाळी ऊन पडे
दवबिदूंचे पडति सडे
हिरव्या पानांतुन वरती
येवोनी फुललो जगती
हृदये अमुची इवलीशी
परि गंधाच्या मधि राशी
हासुन डोलुन
देतो उधळुन
सुगंध या तो सेवाया;
हळूच या; पण हळूच या!
कधि पानांच्या आड दडू
कधि आणू लटकेच रडू
कधि वाऱ्याच्या झोताने
डोलत बसतो गमतीने
तऱ्हे तऱ्हेचे रंग किती
अमुच्या या अंगावरती
निर्मल सुंदर
अमुचे अंतर
या आम्हांला भेटाया;
हळूच या; पण हळूच या!
कुसुमाग्रज
1 thought on “९. हळूच या हो हळूच या! – दुसरी”