E-School ह्या वेबसाईट मध्ये पदार्पन करत असताना आपल्या या प्रवासाबद्दल माहिती देणे अपरिहार्य आहे. या वेबसाईट मध्ये येण्यापूर्वी हेच कार्य ब्लॉग मार्फत चालवले जात होते. सध्या हा ब्लॉग अजूनही eschool4u.blogspot.in या ठिकाणी सुरु आहे.
ज्या काळात इन्टरनेट हे फक्त काही ठिकाणीच आणि व्यावसायिक रुपात फक्त इन्टरनेट कॅफे मध्ये उपलब्ध होते त्यावेळी शिक्षण क्षेत्रात हे कार्य सुरु केले. तंत्रज्ञान हे नेहमी प्रत्येक वेळी शिक्षण क्षेत्रात सर्वात शेवटी पोहोचते. पण या मध्ये मात्र आम्ही दर्शक नसताना सुध्दा आहे त्या परिस्थितीत सुरुवात केली. या ब्लॉग ची सुरुवात झाली २७ ऑक्टोबर २०११ साली. सुरुवातीला यावर फक्त माहिती टाकली जायची जी online उपलब्ध असते तीच फक्त.
आम्ही शैक्षणिक व्हिडीओ सन २०१३ पासून बनवायला सुरुवात केली. ज्यामध्ये मुलांसाठी शैक्षणिक व अभ्यास क्रमवार आधारित , शिक्षकांसाठी प्रशासकीय व शैक्षणिक व्हिडीओ यांचा समावेश होता. यामध्य सर्वसाधारण व अनिमेटेड व्हिडिऑ यांचा सामेश आहे.