उपयुक्त ५ शैक्षणिक अप्लिकेशन

शैक्षणिक कामकाजासाठी विद्यार्थ्याना काही मोफत शैक्षणिक अप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रातील काही अभ्यासू आणि तंत्रज्ञानाची जाण असणारे शिक्षक सुद्धा आहेत. ज्यांनी अशा प्रकारचे शैक्षणिक अप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहेत. आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार आणि आमच्या काही ,मानकानुसार आम्ही ५ अप्लिकेशन ची यादी येथे उपलब्ध करून देत आहोत. सदर अप्लिकेशन हे आमच्या वेबसाईट चे नसून सदर अप्लिकेशन हे आम्ही आपणास सुचवीत आहोत असेही नाही.

१) Talentsearch Quiz | ज्ञानरचनावादातून प्रज्ञाशोध

सध्या आमच्या सर्वेक्षणानुसार हे अप्लिकेशन प्रथम असून हे अप्लिकेशन हे इयत्ता चौथी च्या अभ्यासक्रमांवर आधारित आहे. याचे वैशिष्ट असे कि याची अप्प्लीकेशन ची साईझ हि ५.४ MB असून सध्या याचे installation हे १०००० आहे. यामध्ये app ची डिझाईन उत्तम रीत्या बनवलेली आहे आणि सध्याचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतात. या अप्लिकेशन ची लिंक खाली दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.techedu.talentsearch

२) पाठ्यपुस्तके l पहिली ते बारावी बालभारती पुस्तके

या अप्लिकेशन मध्ये तुम्ही इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची बालभारतीच्या वेबसाईट वरील मराठी माध्यमाची पुस्तके PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. सध्या याची साईझ हि ७.४ MB आहे आणि या अप्लिकेशन चे वैशिष्ट म्हणजे याचे डाउनलोड हे ५०००० पेक्षा जास्त झालेले आहेत. सध्या आपण या अप्लिकेशन मधून पुस्तके डाउनलोड करू शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=com.pdftextbooks

३) 4th Talent Search | चौथी प्रज्ञाशोध

इयत्ता चौथी साठी MCQ प्रश्न व उत्तरासाठी हे अप्लिकेशन बनवलेले असुन यामध्ये प्रश्न व त्याचे चार पर्याय यांचा समावेश करण्यात आला आहे. अप्लिकेशन च्या निर्मात्याच्या दाव्या नुसार यामध्ये ३०८६ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे विद्यार्थायांच्या चौथीचा अभ्यास किंवा स्वयंअध्ययन करण्यास फायदा होईल.

https://play.google.com/store/apps/details?id=copy.apawc

४) इयत्ता चौथी अभ्यासमित्र।4th Class AbhyasMitra

यामध्ये इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांना चौथीच्या पाठ्यपुस्तक मधील सर्व घटक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये इयत्ता चौथी संपूर्ण अभ्यासक्रम,मराठी,गणित,इंग्रजी,परिसर अभ्यास भाग 1 व 2 या विषयांचे शैक्षणिक व्हिडीओ,मनोरंजक टेस्ट,वाचन विकासासाठी बालगीते, इंग्रजी वाचनासाठी इ साहित्य, इत्यादी चा समावेश केला आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.abhyasmitrachouthi
फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.