चतुर हिराबाई

पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले. दोन बैलांपैकी एकच बैल दि+सला.
माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला; पण बैल सापडला
नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता.

माणिक व माणिकची बायको हि राबाई बैल-बाजारात गेले. अचानक हि राबाई ओरडली,
‘‘अहो! हा पाहा आपला बैल. चाेर सापडला.’’ आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता
तो बोलला, ‘‘हा बैल माझाच आहे.’’ दोघे भांडू लागली.

हि राबाई चतुर होती. ति ने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, ‘‘बैलाचा
कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगि तले तर बैल तुझा.’’ चोराने अगोदर उजवा मग
डावा असे सांगितले.

हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला
पकडले. पोलीस आले. चोराला घेऊन गेले. माणिक आणि हि राबाई बैल घेऊन आनंदाने घरी
गेले.

  • प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांग.
  • ही गोष्ट तुझ्या शब्दांत सांग.
  • तुला माहीत असलेली गोष्ट मित्राला सांग.

च- चमचा ……… चार ……… चाक ……… चाळीस ………
छ- छकुला……… छान ……… छमछम ……… छाया ………
ज- जहाज……… जेवण ……… जोडी ……… जनता ………
झ- झबला……… झाड ……… झाकण ……… झुरळ ………
श- शेळी……… शतक……… मशाल ……… माशी ………
ष- षटक……… षटकार……… षटकोन ……… वि शेष ………
स- ससा……… कासव……… दि वस ……… खसखस ………

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.