देवा तुझे किती?

देवा तुझे किती । सुंदर आकाश
सुंदर प्रकाश । सूर्य देतो
सुंदर चांदण्या । चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर । पडे त्याचे
सुंदर ही झाडे । सुंदर पाखरे
किती गोड बरे । गाणे गाती
सुंदर वेलींची । सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले । देवा, तुझी

देवा तुझे किती सुंदर आकाश, ऑडीओ फाईल ऐका आणि म्हणा

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.