शालेय पोषण आहार (वार्षिक ताळमेळ सह )

0.00

MDM साठी आज दिनांक १२ ऑगस्ट २०१८ रोजी नवीन अपडेट देत आहोत. यामध्ये नवीन काय?
यातील काही column हे कमी साईझ चे होते त्यांची रुंदी वाढवली आहे.
केंद्र प्रमुख यांना द्यावयाचा फॉर्म आपोआप निर्माण होतो.
नवीन फॉर्म चा tab वाढवला आहे.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.

Description

mdm 5.3

या ठिकाणी शालेय पोषण आहार संबंधित Excel फाईल देत आहे. या फाईल ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे..

  1. Home page वर प्रथम आपल्या शाळेची पूर्व माहिती भरा.उदा. शाळेचे नाव पासून शाळेची सर्व विचारलेली माहिती,शा.पो.आ.प्रमाण ,दैनदिन मेनू,
  2. आवश्यक त्या ठिकाणी cell मध्ये click केल्यानंतर Dropdown मेनू दिसतो त्याचा वापर करून दिलेले option वापरा.
  3. या Home page वरूनच कोणत्याही महिन्यावर जाता येते.
  4. या फाईल मध्ये एप्रिल ते मार्च हा pattern घेतला आहे.
  5. प्रथम एप्रिल महिना निवडा.
  6. तुम्हाला एप्रिल महिना दिलेल्या लिंक वरून किंवा खाली दिसणाऱ्या sheet label वरून निवडता येईल.
  7. एप्रिल महिन्याची विंडो उघडेल.
  8. वरील बाजूस तुम्हाला भरावयाचा DATA दिसेल त्यामध्ये महिना व पट  निवडा , महिन्याच्या शेवटी जा.क्र., जावक दिनांक, प्राप्त तांदूळ दिनांक भरला तरी चालेल.
  9. धान्यामधील तुरडाळ/मुगडाळ/मसूर/मटकी/चवळी/हरभरा/वाटाणा हे धान्यादी माल आपण कोणत्या दिवशी वापरता हे महिन्याच्या फक्त सुरुवातीलाच नक्की करावे व निवडावे.यामध्ये dropdown मेनू चा वापर करावा.कोणताही वार टाईप करू नये. त्या केल वर क्लिक करा एका बाजूला dropdown मेनू येईल त्याचा वापर करून वार निवडा.


प्रमाण निवडा : एप्रिल महिन्यात धान्याचे प्रमाण निवडा. हे प्रमाण तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एकदाच सेट करावे लागेल.
प्राप्त धान्य : ह्यामध्ये वरील भागामध्ये ज्या ठिकाणी क्लिक होते त्याच ठिकाणी प्राप्त धान्य टाकावे.
दिनांक : दिसणारा  दिनांक योग्य असलेची खात्री करा. मुख्यतः वर्ष बरोबर असलेची खात्री करा.दिनांक निवडल्यानंतर आपोआप वार येईल व वारानुसार तुम्ही HOME page वर निवडलेला शिजवण्याचा मेनू आपोआप येईल.
पट : दररोज असणारा पट व उपस्थिती Enter करा. तुम्हाला आपोआपच सर्व शिजवण्याचे धान्य व त्या दिवसाचे धान्यादी मालाचे अंक येतील.
मासिक ताळमेळ : पान नं १ वर तुम्हाला भरावयाचा DATA आहे. पान नं २ वर दैनदिन शिजवण्याचा अहवाल मिळेल व पान नं ३ वर मासिक ताळमेळ आपोआपच मिळेल.
वार्षिक ताळमेळ : HOME page वर वार्षिक अहवाल वर क्लिक केल्यानंतर वार्षिक अहवाल आपोआपच मिळेल.त्याची फक्त प्रिंट काढणे एवढेच काम शिल्लक आहे. त्यामध्ये सर्व धान्य व धान्यादी मालाचे अहवाल आपोआपच येतात त्यासाठी सर्व महिन्याचे पत्रक भरावे.
सुचना : या फाईल मध्ये cell लॉक केल्याने तुम्ही कोणताही फोर्मुला बदलू शकत नाही.काही सूचना असतील तर http://eschool4u.blogspot.in   or  http://www.facebook.com/eschool4u वर comment करा.

या फाईल चे फायदे :
एकदा पट टाकल्यानंतर त्या दिवसाचे सर्व अंक आपोआपच येतात.
एकदा मासिक अहवाल तयार झाला तर त्यावरून तुम्ही वार्षिक अहवाल आपोआपच मिळवू शकता.

 MDM File Version 3.2

MDM साठी आज दिनांक १२ ऑगस्ट २०१८ रोजी नवीन अपडेट देत आहोत. यामध्ये नवीन काय?
यातील काही column हे कमी साईझ चे होते त्यांची रुंदी वाढवली आहे.
केंद्र प्रमुख यांना द्यावयाचा फॉर्म आपोआप निर्माण होतो.
नवीन फॉर्म चा tab वाढवला आहे.

MDM file Version 5.3

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शालेय पोषण आहार (वार्षिक ताळमेळ सह )”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.
%d bloggers like this: