समूह विमा संरक्षण

विमा संरक्षण : यामध्ये अपघाती विमा संरक्षण , हवाई विमा संरक्षण चा समावेश असतो. हे विमा संरक्षण कितीचे आहे हे त्या वेतन बचत खात्यावरच अवलंबून असते. हे विमा संरक्षण साठी बँक एका विमा कंपनीशी करार करते आणि ती विमा कंपनी तुम्हाला हे विमा कवच प्रदान करते म्हणजे बँक जि माहिती विमा कंपनीला देईल त्यावरच तुम्हाला विमा रक्कम मिळणार कि नाही हे अवलंबून असते. शिवाय दरवर्षी हा विमा आणि विमा कंपनी बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे विमा संरक्षण पाहून त्याआधारित बँक खाते काढणे हे हास्यास्पद आहे. तुम्हला खाते काढले म्हणजे विमा संरक्षण मिळाले असे नव्हे त्यासाठी तुमच्या वारसाला त्या अग्निदिव्यातून जावे लागेल.

यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोन विमा प्रकार असतात.

  • अपघाती मृत्यू विमा योजना
  • अपघाती अपंगत्व विमा योजना.
  • हवाई अपघाती विमा योजना
अपघाती विमा

अपघाती मृत्यू विमा योजना :

या प्रकारामध्ये बँकेच्या ग्राहकाचा जर अपघाती मृत्यू झाला तर बँक त्या ग्राहकाला त्या अपघाती विम्याचा फायदा देते पण यामध्ये साधारण मृत्यू किंवा इतर कारणाने झालेला मृत्यू ग्राह्य धरला जात नाही. यामध्ये मृत्यू येण्याची कारणे हि बँकच तुम्हाला सांगू शकते. त्यामुळे त्यांच्या सांगण्या वर विश्वास ठेवावा लागेल आवश्यक असेल तर तुम्ही बँकेने उतरलेल्या ग्राहकांच्या विमा पोलिसी ची प्रत मागू शकाल. त्यामध्ये सर्व घ्ताकांचा उल्लेख केलेला असतो.

अपघाती अपंगत्व विमा :

या प्रकारामध्ये ग्राहकाचा अपघात होऊन त्याचे अपंगत्व आलेले असावे असा उल्लेख केलेला असतो. यामध्ये कोणतेही दोन अवयव निकामी होणे याला अपंगत्व असे मानले जाते. हे अपंगत्व असे असावे कि त्याम्युळे सदर ग्राहक हा कोणतेही दैनदिन काम करण्यास सक्षम नसावा.

हवाई विमा :

याला एअर अक्सिडेटल कव्हर असे म्हटले जाते. यामध्ये ग्राहकाचा मृत्यू जर हवाई प्रवासादरम्यान झाला असेल तर त्याला या विमा कव्हर चा फायदा होतो. हा विमा सर्वसाधारण विमा रकमेपेक्षा जास्त असतो. काही बँका या हा विमा कव्हर १ कोटी पर्यंत सुद्धा देतात. पण काही विमा कंपन्या या ह्युमन लाईफ व्ह्यल्यू प्रमाणे क्लेम ची रक्कम देतात. याला काही अति व नियम आहेत. यामध्ये ग्राहकाने जर विमानाचे तिकीट हे बँकेच्या कार्ड द्वारेच बुक केले असेल तरच हा क्लेम मिळतो अन्यथा मिळत नाही. काही ग्राहक हे तिकीट एजंट ला काढण्यास सांगतात, त्यावेळी सदर एजंट हे त्यांच्या कार्ड वरून बुकिंग करतात. किंवा काही ऑफर्स साठी वेगळ्या कार्ड वरून विमानाचे तिकीट बुक करतात त्यावेळी या ग्राहकास या विम्याचा लाभ मिळत नाही. जरी विम्याचा लाभ मिळाला तरी त्याच्या वारसाला विम्याची रक्कम हि ह्युमन लाईफ व्ह्यल्यू द्वारेच देतात त्यामुळे खाते निवडताना विमा यां घटकाला तितकासा जास्त महत्व देवू नये कारण आपण यासाठी टर्म विमा अगोदरच निवडलेला असतो.

  • यामध्ये बँक दरवर्षी विमा कंपनीला पैसे देत असते.
  • नवीन कंपनीबरोबर करार केला तर सदर विमा प्रकार तोच असेल याची खात्री नसते.
  • जर नवीन कंपनीचा करार संपला आणि बँकेने वेळेत नूतनीकरन केले नाही तर विमाधारकास त्याचा लाभ मिळणार नाही.
  • बँक सदर विमा रक्कम कमी किंवा जास्त करू शकते.

बँकेला तुम्ही कोणता प्रश्न विचाराल?

एखाद्या कंत्राटी सेवकाला ६००० रुपये पगार असेल आणि त्याचा हवाई प्रवासात मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला किती रुपये मिळतील?

बँकेजवळ काय मागाल ?

बँकेने ग्राहकाचा विमा केलेक्ल्या कराराची नक्कल

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.