राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२० साठी नामाकन आवेदन

MHRD हि दिल्लीस्थित एक राष्ट्रीय संस्था आहे ज्याद्वारे या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे (NAT Award) आयोजन केले जाते. यामध्ये भारतातील मान्यतापत्र शिक्षण संस्थेतील मान्यतापत्र शिक्षक हे आवेदन करणेसाठी पात्र असतात. हा पुरस्कार संपूर्ण भारतातील कोणताही शिक्षक आवेदन करणेसाठी आपापल्या राज्यातील शिक्षण विभागा मार्फत अर्ज करू शकतात. आणि त्यामधून काही निवडक शिक्षकांना देशपातळीवरील राष्ट्रीय पुरस्काराच्या निवड प्रक्रियेसाठी पुढे पाठवले जाते. यासाठी काही पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. त्या खालीलप्रमाणे आहेत.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी आवश्यक पात्रता.

 • राज्यसरकारने मान्यताप्राप्त शाळेत सदर शिक्षक कार्यरत असावा. आणि त्या शाळेस व शिक्षकास मान्यता असावी.
 • या पुरस्कारासाठी निवृत्त शिक्षक पात्र असत नाहीत पण अपवादात्मक परिस्थितीत सदर शिक्षकास या पुरस्कारासाठी निवडले जाऊ शकते. त्यासाठी आपणास त्यांच्या योग्य त्या निवड व अटी चा अतिरिक्त अभ्यास करावा लागेल किंवा आपल्या जिल्यातील / कार्यक्षेत्रातील शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.
 • या पुरस्कारासाठी फक्त शिक्षक पदाचा विचार केला जातो. अन्य पद असेल जसे, लिपिक,शिक्षण क्षेत्रातील अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी.
 • शिक्षक किंवा मुख्याध्यापक हे या पदासाठी असल्याने फक्त शासकीय मान्यताप्राप्त शिक्षक यासाठी पात्र आहेत, खाजगी शिकवणी करणारे व व्यवसाय करणारे या पुरस्कारासाठी अर्ज पात्र असणार नाहीत.

National Teacher Award 2020 साठी अर्ज कसा करावा ?

 • सर्व आवेदन पत्रे हि ऑनलाईन वेब पोर्टल मार्फतच घेतले जातील.
 • आवेदन पत्रे हि दिनांक ६ जुलै २०२० पर्यंत मानव संसाधन मंत्रालय च्या वेबसाईट वर पोहोच होणे आवश्यक आहे.
 • काही तांत्रिक त्रुटी निर्माण होणे मुळे किंवा इतर कारणामुळे जर शेवटची दिनांक बदलली असेल तर त्याबद्दलची खात्री मानव संसाधन च्या वेबसाईट वर किंवा आपल्या राज्यातील शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.
 • ऑनलाइन आवेदन पत्र भरताना पुरस्कारासाठी आवश्यक असणारे घटक जसे आवेदन पत्र पोर्टफोलिओ, पोर्टफोलिओ संबधित सर्व कागदपत्रे, ध्वनिफिती, व्हिडिओ, फोटो आदी आवश्यक तत्सम बाबी जोडाव्यात.
 • शेवटी “सदर सर्व बाबी या खऱ्या आहेत” अशा आशयाचे Undertaking सुद्धा यासोबत जोडणे आवश्यक आहे.

आवेदन पत्र भरा

जिल्हा निवड प्रक्रियेबद्दल.

 • जिल्हा निवड प्रक्रियेमध्ये प्रथम फेरीत जिल्ह्याचे निवड अधिकारी हे प्राथमिक स्तरावर तपासणी करतील.
 • पात्र ३ उमेदवार हे जिल्हा निवड प्रक्रियेमधून राज्य निवड प्रक्रियेसाठी पाठवले जातील.
 • सदर निवड प्रक्रियेमध्ये जिल्हा निवड समिती हि सदर शिक्षकाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून राज्य निवड समितीस नामांकन पाठवतील.

राज्य निवड समिती

 • राज्य निवड समितीचे सदस्य हे जिल्हा निवड समितीने पाठविलेल्या उमेदारांची पडताळणी करतील.
 • त्यानंतर सर्व पात्र उमेदवारांची आवश्यक संख्येची यादी बनवतील आणि सदर यादी हि राष्ट्रीय स्तरावर पाठवतील.
 • http://nationalawardstoteachers.mhrd.gov.in/Teacher_Award.aspx येथे आतापर्यंत ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळालेला आहे त्या शिक्षकांचे पोर्टफोलिओ येथे पहावयास मिळतील.

मदतीसाठी काही दुवे

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.