उंच उंच गगनात तिरंगा – Unch Unch gaganat tiranga

हे गीत ही महाराष्ट्र शासनाच्या गीतमंच मधून निवडण्यात आलेले एक गीत आहे. हे सध्या शाळा शाळामध्ये गायले जाते आणि प्रत्येक विद्यार्थी च्या तोंडांमध्ये ही गीत आपणास गात असलेले दिसेल. या गीतामधून महाराष्ट्रातील प्रत्येक नांगरिकाच्या मनात देशाची प्रतिमा उंचावणे व राष्ट्रप्रेम निर्माण करणे ही उद्दिष्टे दिसून येतात. हे गीत प्रत्येक शाळेत परिपाठ च्या वेळी समूह गीत म्हणून सुद्धा गायले जाते.

उंच उंच गगनात तिरंगा - Unch Unch gaganat tiranga

उंच उंच गगनात – unch unch gaganat tiranga

उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो
हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद
भारती सूर एक नांदतो ||धृ||


भारत माता जन्मदायनी अमृत पुत्रांची
राष्ट्रपूरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची
तुझ्या किर्तीच्या अवनीवरती सुगंध दरवळतो ||१||


नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे
वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतिक ऐक्याचे
आम्रतरु जणू वात्सल्याची नित्य सावली देतो||२||

मनमंदिरी स्थान आईला, नित्य आम्ही दिधले
उत्थानातसव भारतभूच्या जीवन वेचू आपले
तिची कस्तुरी गंधित माती ,भाळावर लावतो ||३||

उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो
हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद
भारतीय सूर एक नांदतो ||४||

या गीतमंच मधील गीतची आम्ही सध्या एक ऑडिओ व व्हिडिओ फाइल येथे देत आहे. त्या फाइल चा वापर तुम्ही प्ले करण्यासाठी करू शकता.

उंच उंच गगनात तिरंगा

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.