दिवाळी 

दिवाळी - शब्द उत्पत्ती 

दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ".

दिवाळी या सणाचे दिवस

वसुबारस               गोवर्धन पूजा धनत्रयोदशी           भाऊबीज नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा

वसुबारस

भारतातील विविध समाजांची दिवाळी

– जैन समाज : आश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना 'निर्वाण लाडूं'चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.

वसुबारस

भारतातील विविध समाजांची दिवाळी

– आंध्रातील तेलुगू समाज :  ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंबा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.

वसुबारस

भारतातील विविध समाजांची दिवाळी

– बंगाली समाज :  दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.

वसुबारस

भारतातील विविध समाजांची दिवाळी

– बौद्ध समाज :  गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.

वसुबारस

भारतातील विविध समाजांची दिवाळी

– तमिळ समाज :  प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.

वसुबारस

भारतातील विविध समाजांची दिवाळी

महाराष्ट्रातील मराठी समाज :  लक्ष्मी पूजन सोडले तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे ही यांची दिवाळी.

वसुबारस

भारतातील विविध समाजांची दिवाळी

– केरळमधील मल्याळी समाज :  दिवाळीच्या दिवशी अय्यप्पा देवाची पूजा करतात. घरांभोवती आणि मंदिरांत रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्ने बनवून लोकांना केळीच्या पानांमधून प्रसाद वाटतात.

वसुबारस

भारतातील विविध समाजांची दिवाळी

– पंजाबातील शीख समाज :  शीखांच्या ६व्या गुरूंना जहांगीर बादशहाने कैद करून ठेवले, त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली. म्हणून शीख तो दिवस 'दाता बंदी छोड दिवस' म्हणून साजरा करतात.

वसुबारस

भारतातील विविध समाजांची दिवाळी

– सिंधी समाज :  पूर्वी सिंधू नदीच्या काठी दिवे लावायची सिंधी परंपरा होती. आता घरात गणेशाची आणि लक्षमीची पूजा करून घराच्या दरवाज्यांत दिवे लावतात.

वसुबारस

आमच्या सर्व  Eschool धारकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा