Sale!

अधिकारी व कर्मचारी मत्ता व दायित्व प्रमाणपत्र (एक्सेल मध्ये) 4 page Matta v dayitv excel pdf

0.00

मत्ता व दायित्व विवरण साठी उत्कृष्ट फाईल

एका ठिकाणी माहिती भरा व इतर ठिकाणी आपोआप भरली जाईल.

सुबक डिझाईन व सहज सोपी प्रिंट.

सन 2023 साठी उपलब्ध.

Category: Tag:
फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.

Description

अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयात द्यावयाच्या मत्ता व दायित्व च्या कागदपत्राची पूर्तता या ठिकाणी उपलब्ध असलेल्या Excel फाईल च्या साह्याने करू शकतात. या ठिकाणी सदरची फाईल उपलब्ध करून देण्याचा मानस हा फक्त काम सोपे करणे इतकाच आहे. काही सूचना किंवा दुरुस्ती असल्यास comment करा.

मत्ता व दायित्व Excel फाईल बाबतच्या काही तांत्रिक बाबी.

  • Font : Kokila
  • Paper Size : A4
  • Orientation : Landscape

प्रपत्र १

(१) स्तंभ ५ मध्ये सध्याची अंदाजित किंमत नोंदवावी.

(२) रकाना ७ मध्ये तात्पुरती गहाण किंवा लीजद्वारे मालमत्ता संपादन करण्यात आली असेल ती सुध्दा विचारात घ्यावी. ती लीजद्वारे (भाडेपट्टीद्वारे) संपादन करण्यात आली असेल तर तिचे एकूण वार्षिक भाडे, आणि जर वारसा, भेट किंवा अदलाबदल करुन ती संपादन करण्यात आली असेल तर संपादन केलेल्या मालमत्तेचे अंदाजे मूल्य नमूद करावे.

(३) हे प्रपत्र प्रत्येक वर्षी ३१ मार्चच्या स्थितीस अनुसरुन त्यावर्षीच्या ३१ मे पर्यन्त सादर करावे.

 

प्रपत्र २

(अ) सर्व रोकड सुलभ मत्ता, जसे रोकड, सर्व प्रकारची बँक खाती, आवर्त ठेव खाती, मुदत बंद ठेवी, कॅश सर्टिफिकेट्स, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाती, पोस्ट ऑफीस बचत खाती, पोस्ट ऑफीस मुदत बंद ठेवीची खाती, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, सामाजिक सुरक्षा प्रमाणपत्रे, मुदतीच्या आवर्त ठेवी, शेअर्स, कर्जरोखे, कर्जे इत्यादी सर्व प्रकरणे ठेवींची रक्कम, मूल्य, दर्शनी मूल्य इत्यादी माहिती नमूद करावी.

(आ) सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी/अंशदायी भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा पॉलिसी, पोस्टल विमा पॉलीसी, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतील, अंशदायी भविष्य निर्वाह निधीतील जमा रक्कम व प्रत्येक विमा पॉलिसीद्वारे आश्वासित असलेली रक्कम दर्शविण्यात यावी.

(इ) जडजवाहिर (एकूण मूल्य दर्शवावे) (ई) चांदी व इतर बहुमोल धातू व जडजवाहिरात मोडत नसलेली मौल्यवान रत्ने (सर्वांचे एकूण मूल्य) आणि,

(उ) इतर चल मालमत्ता जसे की, मोटार गाडया, स्कूटर्स/मोटर सायकल, रेफ्रिजरेटर, एअरकंडिशनर,रेडिओ/रेडिओ ग्राम/टी.व्ही सेट (दूरचित्रवाणी संच) ज्यांची किंमत प्रत्येक प्रकरणी मूळ वेतनाच्या दुप्पटीपेक्षा जास्त आहे अशा इतर वस्तू (रोजच्या वापरातील कपडे, भांडी, पुस्तके, काच सामान इत्यादी वस्तू वगळून) प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे मूल्य दर्शविण्यात यावे.

(२) वरील टिप (१) (अ) मध्ये दर्शविलेल्या रोकड सुलभ सत्तेबाबत व टिप (१) (आ) मध्ये दर्शविलेल्या भविष्य निर्वाह निधी/अंशदायी भविष्य निर्वाह निधी आणि विमा पत्रे (इन्शुरन्स पॉलिसीस) बाबतचे वर्णन स्तंभ २ मधे नमूद करावे. (बँकेचे नाव, पत्ता, पोस्ट ऑफीसचा पत्ता, युनियन ट्रस्ट ऑफ इंडियाच्या शाखेचा पत्ता, कंपनी/फर्म/ऋणको यांचे पत्ते) इ. पूर्ण तपशिल स्तंभ ३ मध्ये नमूद करण्यात यावा.

(३) भाडे खरेदी तत्वावर व हप्तेबंदीवर घेतलेल्या वस्तूंच्या पोटी हे विवरण सादर करण्याच्या दिनांकापर्यन्त भरलेली रक्कम नमूद करावी.

 

प्रपत्र ३

(१) दोन महिन्यांच्या मूळ वेतनाच्या रकमेपेक्षा अधिक नसणारी प्रत्येक कर्जाची रक्कम नमूद करण्याची आवश्यकता असणार नाही.

(२) या विवरणपत्रात वाहन खरेदीसाठी अग्रिम, घरबांधणीसाठी अग्रिम (वेतन अग्रिम आणि प्रवास भत्याये अग्रिम, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतून घेण्यात आलेली अग्रिमे आणि विमा पत्रावर आणि कायम ठेवीवर काढलेली अग्रिम याव्यतिरीक्त) इत्यादी सारख्या शासकीय कर्मचाऱ्याने घेतलेल्या कर्जाच्या अग्रिमांचाही अंतर्भाव करावा.

(३) हे प्रपत्र प्रत्येक वर्षी ३१ मार्चच्या स्थितीस अनुसरुन त्यावर्षीच्या ३१ मे पर्यन्त सादर करावे.

(४) हे प्रपत्र प्रत्येक वर्षी ३१ मार्चच्या स्थितीस अनुसरून त्यावर्षीच्या ३१ मे पर्यन्त सादर करावे,

 

वरील मत्ता व दायित्व च्या विवरण बद्दल अधिक माहिती आम्ही आपडेट करत राहू.

अधिकारी व कर्मचारी मत्ता व दायित्व प्रमाणपत्र (एक्सेल मध्ये) 4 page Matta v dayitv excel pdf

मत्ता व दायित्व विवरण साठी उत्कृष्ट फाईल एका ठिकाणी माहिती भरा व इतर ठिकाणी आपोआप भरली जाईल. सुबक डिझाईन व सहज सोपी प्रिंट.

Product Brand: Excel File

Product Currency: Rs.

Product In Stock: InStock

Editor's Rating:
4.79
फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अधिकारी व कर्मचारी मत्ता व दायित्व प्रमाणपत्र (एक्सेल मध्ये) 4 page Matta v dayitv excel pdf”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.