आई, मला छोटीशी बंदूक दे ना !
बंदूक घेईन । शिपाई होईन ।
ऐटीत चालीन । एक दोन तीन ।।१।।
आई, मला छोटीशी मोटार दे ना !
मोटार घेईन । ड्रायव्हर होईन ।
गावाला जाईन । पों पों पों ।।३।।
आई, मला छोटेसे वि मान दे ना !
वि मान घेईन । पायलट होईन ।
आकाशी जाईन । भर भर भर ।।४।।
आई, मला छोटीशी बाहुली दे ना !
बाहुली घेईन । ति जला मी सजवेन
ती संगे नाचेन । छुम छुम छुम ।।५।।