रेघ लहान झाली

अकबर आणि बि रबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशहा अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले, ‘‘ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची; पण पुसायची नाही. जमेल तुला?’’

बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहि ले. थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, ‘‘महाराज, झाली की नाही तुमची रेघ लहान?’’ बादशहा चकित होऊन पाहतच राहिला

हे करून बघ.
(१) पाटीवर एक रेघ काढ. ती रेघ न पुसता लहान करून दाखव.
(२) पाटीवर एक रेघ काढ. त्या रेघेला हात न लावता ती मोठी करून दाखव.
(३) बि रबलाने रेघ लहान करण्या ची युक्ती केली तशी दुसरी युक्ती तुला सुचते का? कोणती ते सांग.

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.