१२. पाऊसफुले

आज शनिवार. सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, “अगं आई, सकाळ झाली. तू कामाला लागलीस. खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला? प्रकाश कसा नाही पडला गं? अं.. अजून रात्र आहे का गं आई?”
आईने ससोबाला जवळ घेतलं. खुदकन हसत ससोबा म्हणाला, ‘‘आई.. तुझ्या मिशा टोचतील हं मला.’’ तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, ‘‘अरे वेडुल्या , ऐक तर.’’ ससोबा कान ताठ करून ऐकू लागला.
आई सांगू लागली, ‘‘आता आभाळ भरून आलंय. आकाशात काळे ढग आलेत. आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या वि जेचा. आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा. मग येईल पहिला पाऊस. गारेगार पाऊस. रिमझिम पाऊस. तडतड पाऊस. मुसळधार पाऊस.’’ कोबी आणि गाजरं घेऊन बाबा बागेतून येत होते. ससोबा शेपटी ताठ करून जोरात धावत सुटला. पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्या ला बाबांना सांगायची होती. इतक्यात चमकन् वीज चमकली आणि झाला की गडगडाट! ससोबा इतका दचकला, की धाडकन् बाबांवरच आपटला. काही बोलणार इतक्यात टपटप टपटप पाऊस वाजू लागला. ससोबाला इतका आनंद झाला, की त्याला काही बोलताच येईना. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली.

घरी आई वाटच पाहत होती. घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला.
आई, ससोबा आणि बाबा सारे मि ळून पावसात गारेगार भि जले. पावसात नाचले. गाणी गायले.
पाऊसफुलांत भिजताना आपल्या ओल्या मि शांवर हात फि रवत ससोबा आईला म्हणाला,
‘‘आई-आई पावसात असं भिजल्या वर आल्याचा गरमगरम चहा बरा, म्हणून मी तुला
भिजायला आणलं गं…’’
चिंब भिजलेल्या ससुल्या ला जवळ घेत आई म्हणाली, ‘‘आलं माझ्या लक्षात!’’

राजीव तांबे

———————————————स्वयंअध्ययन——————————————-

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.