१३. एक तांबडा भोपळा

एक तांबडा भोपळा
विळीवर कापला
त्या च्या उभ्या फोडीमध्ये
अर्धचंद्र लपला

एक तांबडा भोपळा
उन्हात वाळवला
पाठीवरती बांधून
बाळ्या पोहू लागला

एक तांबडा भोपळा
तंबोऱ्याला लावला
कुणी तारा छेडताच
साथ करू लागला

एक तांबडा भोपळा
पाय लावले त्या ला
गेला टुणुक टुणुक
घेऊन म्हातारीला

एक तांबडा भोपळा
कुुठं होता पळाला?
गणिताच्या पुस्तकाात
जागोजागी मिळाला.

———————————————स्वयंअध्ययन——————————————-

काय ते सांग.
(अ) काापण्या साठी वापरतात………………………….
(आ) उन्हात वाळवितात…………………………………
(इ) गणिताच्या पुस्तकाातील भोपळा………………….

खालील शब्द वाचा आणि Push To Speak बटण दाबून मोठ्याने उच्चारा.

ख्य संख्या मुख्य सख्य नवख्या
क्य वाक्य अशक्य इतक्यात बोक्याला
द्द मुद्दा मुद्दल हद्द बद्दल

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.