१९. संगणकाची करामत

बाई : नमस्कार, बालमित्रांनो.
विद्यार् थी : नमस्कार, बाई.
बाई : मुलांनो, आज तुम्हांला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे.
छाया : बापरे! माणसापेक्षा वेगाने..? किती मोठे असेल ते यंत्र! बघायलाच हवे.
मंगेश : खरंच, असेल का असे यंत्र पल्लवी?
बाई : मंगेश काय रे, काय झाले? असा शंकेखोर नजरेने का पाहतोस?
पल्लवी : बाई, त्याला वाटते, असे काही नसेलच.
बाई : चला तर माझ्या सोबत. मी तुम्हांला दाखवते. हे बघा. याला संगणक म्हणतात.
(सर्वच मुले आश्चर्यचक ित नजरेने पाहतात.)
समीर : बाई ही वायर कसली हो आणि वायरला उंदरासारखे काय जोडले आहे?
बाई : अरे याला माऊस म्हणतात. इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना!
49
सुनित ा : बाई हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना.
बाई : हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे; परंतु तो खूप कामे करतो बरं. संगणकावर
टाईप करता येते. गाणी, गोष्टी ऐकता येतात. चित्रपट पाहता येतात. संदेश,
चित्रे, पत्रे, पुस्तक े यांसारखी माहि ती जगात कोठेही वेगाने पाठवता येते. चित्रे
काढता येतात. खूप माहिती साठवून ठेवता येते.
अक्षय : बाई, पुस्तक ातील पाठ, चित्रे संगणकावर पाहता येतील का? कविता ऐकता
येतील का?
बाई : हो.
साहि ल : बाई, आम्हां ला ऐकवा ना मग!
बाई : च ला आपण ऐकूया.
(हळूच या हो हळूच या! ही कवि ता ऐकवतात आणि मुलाफुलांचा संवाद
दाखवतात. मुले आश्चर्यचक ित नजरेने पाहतात.)
साहि ल : बाई, खरंच किती छान! हा संगणक कसा लिहितो?
बाई : मी दाखवते तुम्हांला. (बाई कीबोर्ड वर टाईप करतात आणि अक्षरे दिसू
लागतात.)
अर्च ना : बाई, संगणक कोणते काम करतो हे समजले. फारच करामती आहे हा संगणक!
आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू. तुम्ही कराल ना मदत?
बाई : हो. पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू.

———————————————स्वयंअध्ययन——————————————-

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.