कणभर तीळ

वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
उडत चालले टणाटणा!
वाटेत भेटला ति ळाचा कण
हसायला लागले ति घेही जण!

तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर!
‘‘तिळा, तिळा, कसली रे गडबड?’’
‘‘थांबायला वेळ नाही.
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड!’’
‘‘ऐक तर जरा, पहा तर खरा,
कणभर ति ळाचा मणभर नखरा!’’
‘‘बघा तरी थाट! सोडा माझी वाट!’’
‘‘बघूया गंमत, करूया जंमत!
चला रे जाऊ याच्या बरोबर.’’

तीळ चालला भराभर. वाटेत लागले ताईचे घर.
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात!
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
‘‘घाल मला पाकात, हलवा कर झोकात.’’
ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्या ने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत.
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरून!

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.