एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे
संमेलन भरले होते. जाई, जुई, कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती. झेंडू, कण्हेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी! पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलतहोते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला, ‘‘चला, चला फुलांचा राजा आला. चला स्वागताला.’’ सगळी फुले सावध झाली. आपापल्या जागेवर ताठ उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल, टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले. बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाबराजे बसले. सगळीकडे शांतता पसरली. सदाफुलीने छान गाणे म्हटले. झेंडूने गोष्ट सांगितली. फुलपाखरांनी नाच करून दाखवला. निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. जाई-जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले.

मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले. ‘‘माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात आपण माझे स्वागत केले. माझे मन हरखून गेले.मी आज खूप आनंदी आहे. आजपर्यं त सगळ्यां च्या स्वागताला मीच पुढे असायचो; पण आज माझे स्वा गत! मन अगदी प्रसन्न झाले. मित्रां नो, आपला सुगंध असाच सर्व त्र दरवळत राहो. प्रत्येकांच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते. धन्यवाद!’’ सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या . जणू काही त्यां नी टाळ्याच वाजवल्या आणि ति थेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली. अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय? ति च्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या .
1 thought on “२४. फुलांचे संमेलन”