झाडावर चढू,
आकाशात उडू.
ढगांच्या गादीवर,
धपकन पडू.


मऊमऊ ढगांवर,
घडीभर लोळू.
चमचम चांदण्यांशी,
लपाछपी खेळू.
पळणाऱ्या चांदोबाच्या ,
मागे मागे धावू.
चांदण्यांच्या पंगतीला,
पोटभर जेवू.

चांदोबाशी गोडीनं,
खूप-खूप बोलू.
घरातल्या गमती,
सांगत चालू.
चालून चालून,
दुखतील पाय.
चांदोबा बोलेल मला,
‘‘दमलास काय?’
‘‘बस माझ्या पाठीवर,
फि रायला जाऊ.
आकाशगंगा जरा,
जवळून पाहू.’’

चांदाेबाच्या पाठीवर,
पटकन बसू.
आकाशात फिरताना,
ताऱ्यांसारखं हसू.
एकनाथ आव्हाड
1 thought on “२७. चांदोबाच्या देशात.”